-
Diwali 2025: तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) करण्याआधी संपूर्ण घर स्वच्छ करावे. दाराबाहेर रांगोळी काढावी आणि दिवे लावावे.
-
लक्ष्मीपूजन करण्यासाठी सुरूवातीला चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल कापड टाकावा. त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा. त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी. तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा. त्या विड्यावर नारळ ठेवावे.
-
लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदीची नाणी किंवा साधी नाणी, तसेच व्यापार संबंधित पुस्तके किंवा नवीन डायरी ठेवावी.
-
सुरूवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी. शेवटी मनोभावे आरती करावी.
-
लक्ष्मीपूजन करण्याआधी घरातील सर्व दरवाजे, खिडक्या आणि लाईट चालू ठेवावेत. घरात अंधार ठेवू नका.
-
लक्ष्मीपूजन करण्याआधी पूजेच्या जागेसह संपूर्ण घर स्वच्छ ठेवावे.
-
लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणाबरोबरच पैशांचे व्यवहार करू नका.
-
पूजा करताना किंवा संपूर्ण दिवसात कोणाशीही भांडू नये किंवा वादविवाद करू नये.
-
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणे कटाक्षाने टाळा.
-
Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.

आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस