-
यंदा रविवारी, ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा केला जाईल. या दिवशी तुळशीचे लग्न भगवान विष्णूंचे रूप असलेल्या शालिग्राम यांच्याशी लावतात.
-
भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतात.
-
लग्नाशिवाय या दिवसापासून उपनयन, गृहप्रवेश इत्यादी अनेक शुभ कार्ये सुरू होतात.
-
कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात.
-
ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते.
-
तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख-समृद्धी येते असे मानले जाते.
-
तुळशी विवाहनिमित्त अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) इन्स्टाग्रामवर काही नवीन रांगोळी डिझाईन शेअर केल्या आहेत.
-
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात ही तुळस आहे.. ते घर स्वर्गासमान आहे, तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)
VIDEO : “आत्महत्येएवजी एक योजना आखली”, मुंबईत १७ मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहित आर्यचा व्हिडीओ व्हायरल; “म्हणाला, माझ्याबरोबर…”