-
SIP म्हणजे Systematic Investment Plan म्हणजेच नियमितपणे ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची पद्धत. यात दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीत थोडी रक्कम गुंतवली जाते, ज्यामुळे दीर्घकाळात मोठी बचत आणि चांगला परतावा मिळू शकतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
SIP मध्ये सातत्य ठेवा
बाजार वर-खाली होतात, पण मध्येच SIP थांबवणं चुकीचं ठरतं. दीर्घकाळ गुंतवणूक ठेवल्याने कंपाऊंडिंगचा आणि सरासरी दराचा फायदा मिळतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
संयम ठेवा, घाई करू नका
SIP म्हणजे झटपट पैसा मिळवायचा मार्ग नाही. फक्त २-३ वर्षांत मोठा नफा मिळेल अशी अपेक्षा चुकीची आहे. खरे फायदे १०-१५ वर्षांनंतर दिसू लागतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
योग्य फंड निवडणं महत्त्वाचं
इतरांच्या सल्ल्यावर फंड निवडू नका. तुमचे उद्दिष्ट, कालावधी आणि जोखीम पातळी यानुसार फंड निवडल्यास परतावा चांगला मिळतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
उत्पन्न वाढल्यावर SIP वाढवा
पगार वाढला की SIP रक्कम १०-१५% ने वाढवत जा. या ‘स्टेप-अप SIP’ मुळे दीर्घकाळात मोठी रक्कम तयार होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
पोर्टफोलिओचा आढावा घ्या
गुंतवलेले फंड कसे काम करत आहेत हे वर्षातून एकदा तरी तपासा. कमी परफॉर्म करणारे फंड बदलणे फायद्याचे ठरते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
बाजारातील चढउतारांना घाबरू नका बाजार खाली गेला म्हणून SIP थांबवू नका. अशा काळात खरेदी स्वस्त होते आणि दीर्घकाळात सरासरी परतावा वाढतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
उत्पन्न वाढल्यावर SIP वाढवा पगार वाढला की SIP रक्कम १०-१५% ने वाढवत जा. या ‘स्टेप-अप SIP’ मुळे दीर्घकाळात मोठी रक्कम तयार होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ