-
चीन चीनने पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश म्हणून आपले स्थान टिकवले आहे. सुमारे ३८०.२ टन सोने उत्पादन करून चीन जगाच्या एकूण सोन्याच्या साठ्यात मोठा वाटा उचलतो.
-
रशिया ३३० टनांहून अधिक उत्पादनासह रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. सायबीरिया आणि पूर्वेकडील भागातील खाणींमुळे रशिया जागतिक सोने बाजारात महत्त्वाची भूमिका निभावतो.
-
ऑस्ट्रेलिया २८४ टन उत्पादनासह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खाणी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात.
-
कॅनेडा २०२ टनांहून अधिक उत्पादनासह कॅनेडा चौथ्या स्थानी आहे. क्युबेक आणि युकोन या प्रांतांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सोने उत्पादन वाढत आहे.
-
अमेरिका १५८ टन सोने उत्पादनासह अमेरिका पाचव्या स्थानावर आहे. या देशाच्या उत्पादनात नेव्हाडा राज्याचा ७५% पेक्षा जास्त वाटा आहे.
-
आफ्रिका १४०.६ टन उत्पादनासह घाना आफ्रिकेतील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. या देशाची अर्थव्यवस्था सोन्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
-
मेक्सिको १४०.३ टन उत्पादनासह मेक्सिको सातव्या स्थानावर आहे. सोनोर आणि झाकाटेकस प्रदेशांमधील खाणी या देशाच्या सोने उत्खननाचे केंद्र आहेत.
-
इंडोनेशिया १४०.१ टन सोने उत्पादनासह इंडोनेशिया आठव्या क्रमांकावर आहे. ग्रसबर्ग माईन ही जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी एक मानली जाते.
-
पेरू १३६.९ टन उत्पादनासह पेरू नवव्या स्थानावर आहे. येथील खाण उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असला तरी अवैध उत्खनन आणि पर्यावरणीय नुकसान ही चिंतेची बाब आहे.
-
उझबेकिस्तान १२९ टन सोने उत्पादनासह उझबेकिस्तान दहाव्या स्थानावर आहे. मुरुण्टाऊ खाण या देशाच्या सोने उत्पादनाचा मुख्य स्रोत आहे आणि जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी ती एक म्हणून ओळखली जाते.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ