“ही मुलगी कोण?”, इन्फ्लुएन्सरचं ‘ते’ वक्तव्य अन् कियाराचे चाहते भडकले, नेमकं काय घडलं?
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या अभिनयाने कमी काळात मोठं यश मिळवलं आहे. तिने 'फगली' चित्रपटातून पदार्पण केलं आणि 'एमएस धोनी', 'कबीर सिंग' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मन जिंकलं. जगभरात तिचा मोठा चहातावर्ग आहे. पण नुकतंच इन्फ्लुएन्सर तायो रिक्कीने कियाराला ओळखत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं. ज्यामुळे कियाराच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. "आम्ही सर्वजण हिला ओळखतो, पण तू कोण आहेस? असा प्रश्न त्यांनी तायोला विचारला. दरम्यान, तायो हा ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर आहे.