Sensex Today: मोठ्या उभारीनंतर शेअर बाजार आज १००० अंकांनी कोसळला; नेमकं कारण काय?
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं, पण गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मोठ्या प्रमाणावर घसरले. सेन्सेक्स १.२७% म्हणजे १०३६ अंकांनी कोसळून ८०,५०० अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी १.३२% म्हणजे ३२७ अंकांनी घसरून २४,४८५ अंकांवर आला. अमेरिकेतील आर्थिक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील नकारात्मकतेमुळे ही घसरण झाली. आयटी कंपन्यांच्या शेअर्सवरही याचा परिणाम झाला.