आजारी पडलात की स्वत:च औषध घेताय? मग थांबा! ‘सेल्फ मेडिकेट’ करणं ठरू शकतं धोकादायक
Self Medicate Can be Harmful: सेल्फ-मेडिकेशन शारीरिक आजारांनाही कारणीभूत ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे किंवा गैरप्रकाराने औषध वापरणे शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवू शकते. काही वेळा ही हानी कायमची असते, असे डॉ. चॅटर्जी म्हणाले. स्वतःवर औषधोपचार करण्याचे दिर्घकालीन परिणाम, ज्या त्रासामुळे आपण औषध घेतले, त्यापेक्षा अधिक घातक ठरू शकतात.