मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; खात्याविषयी म्हणाले…
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने नाराज असलेल्या गटाची नाराजी दूर करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी आज राजभवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. भुजबळ यांनी खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगितले. त्यांना अन्न व पुरवठा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.