उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या आवाहनाला साद? जाहीर भाषणात म्हणाले, “मी ही किरकोळ भांडण…”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना वाद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी कामगार मेळाव्यात प्रतिक्रिया देत, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांना ते समर्थन देणार नाहीत.