कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिली मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील ‘मार्शे दु फिल्म’ विभागासाठी निवड झाली आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित या चित्रपटात क्रिश मोरे, प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्या भूमिका आहेत. खालिद नावाच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या प्रश्नांमधून उगम पावणारी ही कथा आहे.