श्रद्धा कपूरची मावशी ऐतिहासिक मालिकेतून टीव्हीवर कमबॅक करणार, पद्मिनी म्हणाल्या…
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' ही नवी ऐतिहासिक मालिका येत आहे. या मालिकेत पृथ्वीराज चौहान यांचा युवा राजकुमार ते महान योद्धा राजा होण्याचा प्रवास दाखवला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे राजमातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. ११ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करताना पद्मिनी कोल्हापुरे या भूमिकेला विशेष मानतात. ही मालिका १९ मे पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होईल.