scorecardresearch

अहमदनगर

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
Ahilyanagar to prepare action plan to train exporters and boost sugar and dairy exports
अहिल्यानगरमध्ये साखर, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी आराखड्याचे आदेश

जिल्हा उद्योगमित्र समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.

Ahilyanagar schools to conduct weekly bag checks after student murder case
आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात शासनाने नव्याने घोषित केलेल्या चार समित्या सक्षम करण्यात येणार.

संबंधित बातम्या