scorecardresearch

पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.


उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.


विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.


Read More
Parliament
नियमांच्या आग्रहाविना मुद्दय़ांवर चर्चेची विरोधकांची तयारी; संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी ‘इंडिया’च्या डावपेचामध्ये आमूलाग्र बदल

आम्ही चर्चेसाठी अनुच्छेद २६८ वा १७६ अशा कोणत्याही नियमांचा आग्रह धरणार नाही. सोनिया गांधींनी मोदींना लिहिलेल्या पत्रातील नऊ मुद्दय़ांवर ‘इंडिया’तील…

manipur violence
लालकिल्ला: कंगोऱ्यांच्या ‘उत्खनना’विनाच मणिपूरवर खल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे तीनही आठवडे मणिपूरच्या मुद्दय़ावर खर्ची पडले. विरोधकांचे डावपेच आणि नीट अभ्यास करून न येण्याची सवय या दोन्हींमुळे…

rahul gandhi
राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग हटवल्यामुळे काँग्रेस आक्रमक, संसदेचा अवमान होत असल्याचा आरोप! प्रीमियम स्टोरी

फेब्रुवारी महिन्यातही राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरून चांगलाच वाद झाला होता.

PM Narendra Modi Speech today
No Trust Debate: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार अविश्वास प्रस्तावावर उत्तर, मणिपूरवर काय बोलणार? सगळ्या देशाचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्या देशाचं लक्ष

Opposition no confidence motion will be discussed
लोकसभेत आजपासून मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा, सुरुवात करणार राहुल गांधी

१० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ४ वाजता या प्रस्तावावर उत्तर देतील, त्यानंतर मतदान होईल

vidhan bhavan
पावसाळी अधिवेशनाचं फलित..

पुरवणी मागण्यांचं वाढत चाललेलं आकारमान पाहाता हे कुणाला तरी खूश किंवा अंकित करण्याचं साधन होत चाललं आहे का, आणि वित्तीय…

SANSAD BHAVAN
NTC सुधारणा विधेयक आज राज्यसभेत, सर्व खासदारांनी उपस्थित राहावे यासाठी काँग्रेसकडून व्हीप!

राज्यसभेत भाजपाकडे ९२ खासदार आहेत. एनडीएचे खासदार मिळून भाजपाचे संख्याबळ १०३ वर पोहोचते.

ashish shelar bhaskar jadhav
“उबाठा वगैरे काही नाही, शिवसेना एकच”, आशिष शेलारांच्या विधानावर भास्कर जाधव संतापले, सुनावत म्हणाले…

“विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण…”, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं.

prithviraj chavan eknath shinde
6 Photos
“…तेव्हा खुट्टा अधिक बळकट होतो”, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना एकनाथ शिंदेंचं सडेतोड प्रत्युत्तर

“महाराष्ट्राच्या मतदारांशी, शिवसैनिकांशी आणि आपल्या परिवाराशीही गद्दारी आणि बेईमानी केली. मग ते…”, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

uddhav thackeray eknath shinde
“महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हे…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

“आपण ज्यांच्याबरोबर निवडून आलो, त्यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केलं. मग…”, असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

aurangazeb poster devendra fadnavis
“औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस हा योगायोग नाही, तर…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान, दिला ‘हा’ इशारा

“आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता. तो कधी…”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या