ठाणे : महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाले आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,”यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही.” मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना? ‘मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे’, हे पटते का, याचे स्पष्टीकरण अजित पावर आणि त्यांच्या राष्ट्रवादीने द्यावे असे आव्हाड म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. भटकत्या आत्म्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. ४५ वर्षांपूर्वी या खेळाला सुरूवात झाली. ज्या लोकांची स्वप्न पूर्ण होत नाही. अशी माणसे दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत. असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंब या आत्म्याने अस्थिर केले. भाजपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न या आत्म्याने केले असे मोदी या सभेत म्हणाले होते. या टीकेवरून आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : भाजपच्या संमतीअभावी ठाण्याचे ठरेना! सर्वेक्षणाचे हवाले देत प्रस्ताव नाकारल्याची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांना ‘भटकती आत्मा’ असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमके मोदींना म्हणायचे तरी काय होते. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,”यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही.” मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते ६ मेपर्यंत दिवसभर बंद

पवारसाहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय? संपूर्ण भाजपने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, ‘मोदींनी शरद पवार साहेब यांना भटकती आत्मा म्हणणे’, हे पटते का, याचे स्पष्टीकरण द्यावे , खासकरून अजित पवार यांनी ! मराठी माणसे “भटकता आत्मा” कशाला म्हणतात, हे मतदानात दाखवून देतील अशी टीकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad to ajit pawar is it acceptable that pm modi called sharad pawar a wandering soul css