Mumbai Rains: ठाण्यात वीजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस; मुंबई, डोंबिवली, नवी मुंबईतही कोसळला, तासभर जोरदार बरसणार | Mumbai Thane Navi Mumbai Dombivali around has been raining very intensely scsg 91 | Loksatta

Mumbai Rains: ठाण्यात वीजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस; मुंबई, डोंबिवली, नवी मुंबईतही कोसळला, तासभर जोरदार बरसणार

डोंबिवलीमध्ये सकाळपासून ९४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rains: ठाण्यात वीजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस; मुंबई, डोंबिवली, नवी मुंबईतही कोसळला, तासभर जोरदार बरसणार
सकाळपासूनच पावसाने धरलाय जोर

मुंबईशहरासहीत ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यामध्ये वीजांच्या कडकडाटासहीत जोरदार पाऊस दुपारी दीडपासून सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळालं. डोंबिवलीमध्ये सकाळपासून ९४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. दुपारी अडीच वाजताच्या अंदाजानुसार मुंबईसहीत उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे, नवी मुंबई, मध्य मुंबईबरोबरच पूर्व उपनगरांमध्ये पुढील एका तासामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर, एलफिस्टनसारख्या भागांमध्ये पाणी साचू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोर अटकेत; कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या

मुंबई: स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून साडेचार कोटीची फसवणूक; कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकचे कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता
नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
मुंबईः परदेशातून भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली अंधेरीतील तरुणीची चार लाखांची फसवणूक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“अन्ना रासकला…”  मराठमोळ्या संतोष जुवेकरला मिळाली दाक्षिणात्य जाहिरात, व्हिडीओ पाहिलात का?
TRPच्या शर्यतीत बिग बी, कपिल शर्माचा शो पडला मागे; ‘या’ मालिकेने पटकावला पहिला क्रमांक
माझी वसुंधरा उपक्रमात सांगली महापालिकेला सात कोटींचे बक्षीस जाहीर
दोन प्रकारचे पदार्थ किडनीवर विषाप्रमाणे परिणाम करतात, किडनी निरोगी कशी ठेवावी जाणून घ्या…
“केजरीवालांनी टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीविषयी लिहून दिलं होतं की…”, फडणवीसांचा आपवर हल्लाबोल