PM Modi Viral Video : लाईटहाऊस जर्नालिझमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला एका दुकानाबाहेरील फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळून आले. अनेक वापरकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात तो फोटो व्हायरल करत आहेत. या व्हायरल फोटोत एक दुकान आहे, जिथे एका पोस्टरवरील पंतप्रधान मोदींचा फोटो कागदाने पूर्णपणे झाकला आहे. हा फोटो केरळमधील कोझिकोड येथील असल्याचा दावा केला जात होता. पण, अशाप्रकारे पंतप्रधानांचा फोटो का झाकण्यात आला? त्यामागचे नेमके कारण काय, आपण जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर Abhishek Gupta ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइलवर शेअर केले.

इतर वापरकर्तेदेखील हाच फोटो नुकताच क्लिक केला असल्याचा दावा करत शेअर करत आहेत.

Read More Fact Check News : धारावीतील बजरंग दलाच्या अरविंद वैश्यच्या निघृण हत्येचा video आला समोर? नेमकं घडलं काय? वाचा सत्य बाजू

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला चार महिन्यांपूर्वी reddit.com वर पोस्ट केलेला फोटो आढळला.

यावर एका कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, हे EC नियमनचा एक भाग म्हणून केले गेले आहे.

तपासादरम्यान आम्हाला X वर पलक्कड विभागाची एक पोस्ट सापडली.

पोस्टमध्ये म्हटले आहे : हा जुना फोटो आहे, जो निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेनुसार कव्हर करण्यात आला होता. कालिकत स्टेशनवरील PF-4 वरील सध्याच्या OSOP स्टॉलचा एक फोटोही यासोबत जोडला आहे.

पोस्टमध्ये स्टॉलचा अलीकडील फोटोही जोडला होता.

आम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहितादेखील आढळली.

https://www.eci.gov.in/mcc

निष्कर्ष :

केरळमधील रेल्वेस्थानकावर दुकानाबाहेरील पंतप्रधान मोदींचा कागदाने झाकलेला फोटो जुना आहे, जो आदर्श आचारसंहिता असताना क्लिक करण्यात आला होता. त्यामुळे दुकानाचा हा फोटो दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi viral video fact check heres the truth behind viral photo showing pm modis image covered with paper at kozhikode railway station sjr