दुकानातील आईसक्रीमच्या फ्रिजरचा शॉक लागून ४ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालाय. नाशिकच्या सिडको भागात ही दुर्दैवी घटना घडली. चिमुकली ग्रीष्मा वडिलांबरोबर आईसक्रीम घ्यायला ही चिमुरडी दुकानात गेली होती. पण तिथे फ्रिजरचा करंट लागल्यानं तिचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.










