ज्येष्ठपत्रकार दिलीप ठाकूर यांनी केलेले 'सैराट' चित्रपटाचे परीक्षण. सैराट ही एक प्रेमकथा असून, या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेतील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवण्यात आले आहे. आर्ची आणि परश्या या मुख्य व्यक्तिरेखांभोवती या चित्रपटाची कथा फिरते आणि ती प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरू हिला विशेष उल्लेखनीय काम म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. कलाकार - आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे, सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, छाया कदम, भूषण मंजुळे