राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे दोन दिवसीय पुणे दौर्यावर आहेत.त्याच दरम्यान छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. प्रशांत दशरथ पाटील या आरोपीला पुणे पोलिसांनी रायगड येथील महाडमधून अटक केली आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्याप्रकरणी भुजबळ यांनीच सविस्तर माहिती दिली आहे.