Abhishek Ghosalkar Death: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत संतापले आहेत. “शिंदे गटातील आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्याबरोबर चाय पे चर्चा करत आहे. त्यामुळेच अशा हत्या आणि अपहरणाचे गुन्हे घडत आहेत. शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठीच फडणवीस यांना गृहमंत्रीपद दिले आहे का? असे नसेल तर गुंडांना पाठिशी घालणाऱ्यांना तुरुंगात टाका”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य सरकारचे हे अपयश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यांनी आमच्या माथी हे शासन लादले, त्यामुळे गावागावात गुन्हे वाढले आहेत. मोदी-शाह यांनी हे सरकार आमच्यावर लादल्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशीही मागणी त्यांनी केलीये.
Former corporator of Thackeray group Abhishek Ghosalkar has been shot dead. Sanjay Raut, the leader of Shiv Sena’s Ubhata group, is angry over this. “Shinde group MLAs, MPs are having daily chai pe discussions with gangsters. That is why such crimes of murder and kidnapping are taking place. Has Fadnavis been given the post of Home Minister only to jail Shiv Sainiks? If not, put those who support the gangsters in jail”, demanded Sanjay Raut. This is a failure of extra-constitutional government imposed on the state. Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah are criminals of Maharashtra. They imposed this regime on us, so crime has increased in every village. He also demanded that since Modi-Shah imposed this government on us, it is their responsibility that they should dismiss this government and implement President’s rule.