How To get Cast Validity Certificate: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गातल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात वैधता प्रमाणपत्रांची गरज असते. मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण, राजकारण, नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आरक्षित जागांवर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बांधकारक असते. यासोबतच सरकारी नोकरदारांना आरक्षणानुसार बढती मिळवायची असेल तर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असतं.