scorecardresearch

अजय मिश्रा

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More
udayanraje bhosale
VIDEO : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

lakhimpur-6
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”, ‘या’ भाजपा नेत्याची मागणी

भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
Archana Patils Show of Power in Osmanabad Lok Sabha Constituency
धाराशिव : अर्चना पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले..

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद…

PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर टीका केली.…

bhandara lok sabha seat, 106 Year Old Grandmother, casted Vote, polling station, bhandara voting, lok sabha 2024, bhandara news, election news, marathi news
वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केलं मतदान

भंडारा शहरात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी १०६ वर्षांच्या यमुनाबाई सीताराम कुंभारे या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदानाचा…

Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग

नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर फिनिक्स मॉल परिसरात घबराट उडाली.

raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?

मुंबईतील जुहू येथील एक निवासी सदनिका, जी सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे, पुण्यातील निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्स…

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष

Ashutosh Sharma Reaction : पंजाब किंग्जचा आक्रमक फलंदाज आशुतोष शर्मा म्हणाला की, जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्वीप शॉट…

bombay high court, nagpur bench Judges, cast vote, queue
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी रांगेत…

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……

निवडणूक प्रक्रियेत सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अभिनव उपक्रम राबवले जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीतील काही…

संबंधित बातम्या