scorecardresearch

अजित आगरकर

अजित भालचंद्र आगरकर (Ajit Agarkar)हे भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आहेत. ते ४ जुलै २०२३ पासून ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्हीही फॉरमॅटमध्ये २०० पेक्षा जास्त अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.१९९९, २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये त्यांचा समावेश होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या संघामध्येही अजित आगरकर होते.


अजित आगरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. फार लहानपणी त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवत होते. आचरेकर सरांच्या सांगण्यावरुन अजित आगरकर यांना राजा शिवाजी विद्यालयातून शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. शाळेमध्ये असताना अजित शिवाजी पार्क मैदानामध्ये सराव करत असत. याच काळात थोडी फार गोलंदाजी करु शकणार फलंदाज म्हणून ते विकसित झाले. पुढे वयवर्ष १५ असताना त्यांना अंडर-१६ आंतर शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायची संघी मिळाली. तेव्ह त्यांनी तिहेरी शतक झळकावले. मुंबईच्या संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण तेव्हा संघात एका गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे अजित आगरकर यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. शालेय स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबईच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनले.


त्यांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी अजित आगरकर यांनी पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध टी-२० सामन्याच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनी २६ आंतराराष्ट्रीय कसोटी सामने, १९१ एकदिवसीय सामने खेळले. या कसोटी फॉरमॅटमध्ये त्यांनी ५७१ धावा केल्या तर वनडे फॉरमॅटमध्ये १,२६९ धावा केल्या. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्यांनी कसोटी सामन्यात ५८ गडी बाद केले, तर एकदिवसीय सामन्यामध्ये २८८ गडी बाद केले. गोलंदाजी-फलंदाजीसह ते क्षेत्ररक्षणामध्येही तरबेज होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये २१ चेंडूमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकर यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा आणि १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आगरकर यांनी आगळा-वेगळा विक्रम केला होता. या दौऱ्यामध्ये ते सलग पाच वेळा शून्यावर बाद झाले. या विक्रमामुळे त्यांना बॉम्बे डक हे नाव पडले.


Read More
Mohmmad shami
मोहम्मद शमीचं ८ विकेट्ससह अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवडसमितीला प्रत्युत्तर

इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही मोहम्मद शमीची भारतीय संघात निवड झाली नाही.

Ajit Agarkar International Career Lords Century 7 Ducks vs Australia Fastest ODI Fifty 6 Wickets Haul Profile in marathi
सात वेळा शून्यावर बाद, लॉर्ड्सवर शतक, वनडेत फास्टेस्ट फिफ्टी अन्…; चॉकलेट बॉय ओळख असलेल्या चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांची अशी होती कारकीर्द

Ajit Agarakar Career: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा

Ajit Agarkar Viral Video Rohit Sharma Virat Kohli Fans Slams Chief Selector After RoKo Successful Australia Tour
“अरे आगरकर सर पळून जातायत, Ro-Koने…”, अजित आगरकरांची रोहित-विराटच्या चाहत्यांनी उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

Ajit Agarkar Viral Video: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांनी…

sarfaraz khan
Irfan Pathan: ‘खान’ असल्यामुळे सर्फराजची निवड नाही? इरफान पठाणनं स्पष्टच सांगितलं…

Irfan Pathan On Sarfaraz Khan: भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने गौतम गंभीर आणि अजित आगरकरांना समर्थन दिलं आहे.

Rohit Sharma to be Dropped in IND vs AUS 2nd ODI Yashasvi Jaiswal to replace Gambhir Agarakar video
रोहित शर्माला दुसऱ्या वनडेतून मिळणार डच्चू? हिटमॅनच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी, गंभीर-आगरकरांच्या VIDEOमुळे चर्चांना उधाण

Rohit Sharma To Be Dropped in 2nd ODI; रोहित शर्माने सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कमालीचा फिटनेस मिळवत संघात पुनरागमन केलं. पण…

navjot-singh-sidhu-social-media-post-fake
“अजित आगरकर, गौतम गंभीरला हाकला आणि रोहित शर्माला…”, फेक व्हायरल पोस्टवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोडलं मौन

Navjot Singh Sidhu on Viral Post: २०२७ च्या वर्ल्डकपचा उल्लेख करत अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांची हकालपट्टी करा, अशी…

Sandeep Dwivedi on Rohit Sharma ODI Captaincy controversy
Rohit Sharma Captaincy: हा रोहितचा संघ, त्याला मानाने निरोप देता आला असता…

Sandeep Dwivedi on Rohit Sharma ODI Captaincy: रोहितने संघाची मोट बांधली. त्याने संघाला जेतेपदं जिंकून दिली. त्याने खेळाचे बारकावे जसे…

Rohit Sharma’s captaincy exit sparks debate Was BCCI’s move bold or disrespectful
Rohit Sharma Retirement: सविस्तर: रोहितला सन्माननीय निवृत्ती नाकारण्याचा निर्णय धाडसी की निष्ठुर? चर्चा तर होईलच!

Rohit Sharma Retirement Controversy: यापूर्वीही मुंबईकर ‘सिलेक्टर’ने धाडसी निर्णय घेतले असले, तरी भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारास सन्माननीय निवृत्ती घेण्याची संधी…

virat_kohli_rohit_sharma
IND vs AUS: “रोहित- विराट वनडे संघात कशाला?”, माजी खेळाडूचा निवडकर्त्यांना थेट सवाल

Dilip Vengasarkar On Team India Selection: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर प्रश्नचिन्ह…

ajit agarkar
भविष्याच्या विचार करून गिलकडे कर्णधारपद दिल्याचे आगरकर यांचे स्पष्टीकरण

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अपेक्षित संघनिवड करण्यात आली.

Ajit Agarkar Masterstroke for Indian Cricket Rohit Sharma & Virat Kohli Can Play But Future will Decide
अजित आगरकरांचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराट वनडे सामने खेळू शकणार, पण भविष्याचा निर्णय मात्र…

Rohit Virat ODI Future: ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे संघ जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहितला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवत गिलकडे जबाबदारी सोपवली.

Why Rohit Sharma Removed as ODI Captain Ahead of IND vs AUS Series
Rohit Sharma: “त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी…” रोहितला वनडेच्या कर्णधापदावरून हटवण्याचा निर्णय का घेतला? आगरकरांचं मोठं वक्तव्य

Why Rohit Sharma Removed as ODI Captain: रोहित शर्माच्या जागी वनडे संघाचं कर्णधारपद आता शुबमन गिलला देण्यात आलं आहे. पण…

संबंधित बातम्या