कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.…