सचिन तेंडुलकर यांच्या धाकट्या मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण कतेले आहे. वडिलांकडून क्रिकेटचा वसा अर्जुनला मिळाला. फार लहान वयामध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याचे मन फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये जास्त रमले. तो डावखुरा फलंदाज आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा विरुद्ध मुंबईकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याआधी २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर १९ टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने त्याच्यावर बोली लावली होती. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांमध्ये तो या संघाचा सदस्य होता. पण त्याला एकाही सामन्यामध्ये सहभागी होता आले नाही. वडिलांप्रमाणे अर्जुनदेखील महान क्रिकेटर होऊ शकतो अशी आशा सचिनच्या चाहत्यांना आहे. Read More
Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: सचिन तेंडुलकर संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. यादरम्यानचा सचिन-अंजलीचा एक व्हीडिओ व्हायरल…
Sachin Tendulkar Instagram Post: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये साखरपुड्यांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अर्जुन…