अभ्यासक्रमा मान्यतेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी येथील शिक्षण सहसंचालकांसह कार्यालयातील तिघांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून अनेक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात सापडत असतानाही निर्ढावलेले अधिकारी बोध घेण्यास तयार नाहीत.