scorecardresearch

छगन भुजबळ

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
NCP MLA Rohit Pawar said Bhujbal cabinet return may be linked to local elections
‘स्थानिक स्वराज्य’साठी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतले, रोहित पवार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नजरेसमोर ठेवूनच भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा सामावून घेतले असावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…

Chhagan Bhujbal induction in Maharashtra cabinet
अन्वयार्थ: भुजबळांना कोणाचे ‘बळ’? प्रीमियम स्टोरी

नवी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्याप्रकरणी भाजप सरकारच्या कार्यकाळात ‘ईडी’ने भुजबळांना तुरुंगात टाकले होते. भुजबळ म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतीक, असे चित्र तेव्हा…

छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंनाही मंत्रिपद मिळणार? ओबीसी नेत्याचा दावा काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंच्या गळ्यातही लवकरच मंत्रिपदाची माळ? प्रीमियम स्टोरी

Laxman Hake on Dhananjay Munde : छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे हेदेखील काही दिवसांतच मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा ओबीसी नेते…

chagan-bhujbal-back-in-cabinet
भुजबळांच्या मंत्रिमंडळ समावेशाला जातीय समीकरणे, स्थानिक निवडणुकांची किनार?

राज्यात जवळपास ४० ते ४५ टक्क्यांच्या आसपास ओबीसी आहेत. हा भारतीय जनता पक्षाचाही पाठीराखा मानला जातो. अशा वेळी भुजबळ यांची…

Chhagan Bhujbal gets ministerial post because of Ajit Pawar or BJP
भुजबळांना मंत्रिपद अजित पवार की भाजपमुळे?

महायुती सरकारच्या स्थापनेवेळी मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांवरच आरोप केले होते. नेतृत्वाला आव्हान देत…

Chhagan Bhujbal reaction on ministerial post Mumbai news
छगन भुजबळ यांचे पुनरागमन; मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खाते कायम राहणार

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना…

Due to Chhagan Bhujbal, the opportunity for Amalsner MLA Anil Patil was missed
भुजबळांमुळे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची संधी हुकली

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या वाट्याला पुन्हा मंत्रि‍पद येण्याची शक्यता व्यक्त होत असताना, प्रत्यक्षात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ…

Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange after taking oath as minister
Chhagan Bhujbal: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका; म्हणाले…

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. जरांगेंनी केलेल्या…

केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं? प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal Mahayuti Cabinet : केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं.…

Chhagan Bhujbal being included in the state cabinet, it is now believed that Dhananjay Munde has almost lost his chance of getting a ministerial post
भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे धनंजय मुंडेची दारे बंद

मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या