scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला होता. (Photo: Sharad Pawar And Devendra Fadnavis/X )
फडणवीसांशी ‘त्या’ कॉलवर काय बोलणं झालं? शरद पवारांनी दिली माहिती; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत स्पष्ट केली भूमिका

Devendra Fadnavis And Sharad Pawar Phone Call: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर काय चर्चा झाली याची माहिती दिली आहे.

भाजपाचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)
“पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचं तीन ठिकाणी मतदान”, भाजपाचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले, “खरे वोट चोर कोण? राहुल गांधींनी उत्तर द्यावं!”

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसंच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एक पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे. (संग्रहित छायाचित्र)
Devendra Fadnavis : “मी उद्धव ठाकरे, शरद पवारांना फोन केला होता; पण…”; देवेंद्र फडणवीसांची चर्चेबाबत माहिती

देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक ९:३० वाजता सुरू होणार : मुरलीधर मोहोळ (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक ९:३० वाजता सुरू होणार : मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली मानाचे पाच गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि इतर मंडळांचे अध्यक्ष यांच्या सोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. (फोटो - संग्रहित/@KanganaTeam)
Devendra Fadnavis : “RSS काय बंदी असलेली संघटना आहे?”, देवेंद्र फडणवीस यांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला उत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे।

राहुल गांधीला लक्ष्य करणाऱ्या भाजपला जिल्हा काँग्रेसकडून जशास-तसे उत्तर (प्रतिकात्मक छायाचित्र)
राहुल गांधीला लक्ष्य करणाऱ्या भाजपला जिल्हा काँग्रेसकडून जशास-तसे उत्तर

ऐरवी भाजप नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक काँग्रेस नेते तसेच नागपूर जिल्हा काँग्रस आक्रमक झाली. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासह पालकमंत्री आणि त्यांच्या पुत्रालाही लक्ष्य केले.

कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
​कणकवलीतील मटका व्यवसायाला संरक्षण कोणाचे? पालकमंत्र्यांच्या धाडीनंतर पोलिसच आरोपांच्या घेऱ्यात

​गुरुवारी संध्याकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानक कणकवली बाजारपेठेतील महादेव रमाकांत घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला.

पत्रकार परिषद संपल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करून आभार मानले. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
कराड : गणेशोत्सवात देखाव्यांसाठी पाच दिवस रात्री बारापर्यंत मुदत

याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर हा निर्णय झाला असून, याबाबतचे लेखी आदेश प्रशासनाला लवकरच मिळतील, असे शंभूराजेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
Maharashtra News Live Updates : राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी मला…”

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्र व देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत तसेच इतर नेते उपस्थित होते.
फडणवीस यांचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना दूरध्वनी; उपराष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती

राज्यपाल राधाकृष्णन यांचे नाव मुंबईतील मतदारयादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार असलेल्या राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती फडणवीस यांनी पवार-ठाकरे यांना केली.

संबंधित बातम्या