scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाणी योजनेसाठी निधी व वेळेची हमी. (संग्रहित छायाचित्र)
छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर पूर्ण होईल – देवेंद्र फडणवीस

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सुप्रिया सुळे दिंडोरी येथील खेडगावात आयोजित सभेत बोलत होत्या. (PC : Supriya Sule/FB)
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”

Supriya Sule on Non Vegetarian Diet : सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी ‘राम कृष्ण हरी’वाली आहे. केवळ मी तुळशीची माळ गळ्यात घालत नाही एवढाच फरक आहे.

अटल सेतूसह अन्य पथकर नाक्यांवर विद्युत वाहनांना पथकर माफी - परिवहन मंत्री (प्रातिनीधीक छायाचित्र)
अटल सेतूसह अन्य पथकर नाक्यांवर विद्युत वाहनांना पथकर माफी – परिवहन मंत्री

अटल सेतूसह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग, तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व पथकर नाक्यांवर विद्युत वाहनांना पथकर माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पानबाई शाळा - वाकोला नाला उन्नत रस्ता : लोकार्पणानंतर आठवड्याभरातच गतिरोधक उखडल्याने उन्नत रस्ता दुरूस्तीसाठी बंद (संग्रहीत छायाचित्र)
पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्ता : लोकार्पणानंतर आठवड्याभरातच गतिरोधक उखडल्याने उन्नत रस्ता दुरूस्तीसाठी बंद

शनिवारी दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या दोन तासाच्या कालावधीसाठी उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गतिरोधकांची दुरुस्ती झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघात महापालिका प्रभाग रचनेत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.(छायाचित्र -लोकसत्ता टीम )
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातच प्रभाग रचनेत घोळ !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात महापालिका प्रभाग रचनेत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

 उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही - शरद पवार (संग्रहित छायाचित्र)
‘उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही’, शरद पवारांच्या भूमिकेमागचं कारण काय? सविस्तर वाचा…

राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असतानाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनात अटक करण्यात आली होती याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

राहुल पाटील-चंद्रदीप नरके मित्र बनतील - हसन मुश्रीफ (संग्रहित छायाचित्र)
राहुल पाटील-चंद्रदीप नरके मित्र बनतील – हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी तीन मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे वाद विसरून राहुल पाटील – चंद्रदीप नरके हे मित्र बनतील, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केले.

प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, ३१ मार्चची मुदत

सामाजिक क्षेत्रातील योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे.

मराठा आंदोलन, महापालिका प्रभाग रचनेवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबते

मराठा समाजाचे आंदोलन आणि सरकारमधील अंतर्गत वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी खलबते केली.

संबंधित बातम्या