स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कवायतींचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी २३ जुलै रोजी परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या.
सुधारित कार्यपद्धतीनुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.