Page 10 of फुटबॉल News
अनुभवी आक्रमकपटू झेर्दान शकिरीच्या शानदार गोलमुळे स्वित्झर्लंडने पिछाडीवरून पुनरागमन करताना युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.
ऑस्ट्रियाच्या खेळाडूकडून पूर्वार्धात झालेल्या स्वयंगोलमुळे फ्रान्सला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात करण्यात यश आले.
क्लब फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिदसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर ज्युड बेलिंगहॅमने युरो अजिंक्यपद स्पर्धेतही आपली लय कायम राखली आहे.
सामन्याच्या अवघ्या २३व्या सेकंदाला गोल स्वीकारल्यानंतरही गतविजेत्या इटलीने युरो फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. इटलीने अल्बेनियाचा २-१ असा पराभव केला.
सातत्याने राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची खासियत असलेल्या आघाडीपटू वाऊट वेघोर्स्टने पुन्हा एकदा आपला लौकिक दाखवून देत युरो फुटबॉल स्पर्धेत रविवारी…
जर्मनीची आक्रमकता, पासिंग आणि गोल जाळीच्या दिशेने त्यांनी मारलेले फटके सगळेच स्कॉटलंडच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवणारे होते.
भारतासारख्या क्रिकेटला ‘धर्म’ मानणाऱ्या देशात फुटबॉलचे गारूड रुजायला सुरुवात झाली गेल्या दोन दशकांत
जर्मनीमध्ये नुकतीच सुरू झालेली ‘युरो स्पर्धा’ आणि येत्या आठवड्यापासून अमेरिकेत सुरू होणारी ‘कोपा अमेरिका’ ही जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणीच.
क्रोएशिया आणि स्पेन या दोन संघांत यंदाच्या युरो स्पर्धेतील पहिली लढत होईल तेव्हा अनुभवाला तरुणाईचे आव्हान राहणार आहे
स्पर्धेच्या स्वरूपात अनेक बदल झाल्यापासून केवळ तिसऱ्यांदा या स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत.
भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या सुनील छेत्रीने पाच दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील आपला अखेरचा सामना खेळला.
भारतीय फुटबॉल संघ तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीला विजयी निरोप देण्यात अपयशी ठरला. कुवेतविरुद्ध गुरुवारी झालेल्या ‘फिफा’ विश्वचषक पात्रता…