फुटबॉल Videos

फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.

भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.

भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
Read More