लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२५ मध्ये २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.Read More
एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात…
सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवात तीव्र प्रकाश यंत्रणेवर(लेझर लाईट) पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या ‘लेझर लाईट’मुळे…
राज्य सरकारने यापूर्वीच्या आदेशानुसार गोपालकालानिमित्त (दहिहंडी) १६ ऑगस्ट रोजी, तर अनंत चतुर्दशीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती.…
प्रखर प्रकाशझोतांमुळे डोळे दिपून टाकणाऱ्या आणि प्रसंगी डोळ्यांमध्ये दोष निर्माण करणारे लेसर लाईटच्या वापरायला यावर्षी सुद्धा कोल्हापुरात प्रतिबंध करण्यात आला…