Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

गौतम अदाणी Photos

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
pm modi on rahul gandhi
9 Photos
अंबानी, अदाणी नावांचा उल्लेख करत राहुल गांधींवर पंतप्रधान मोदींची खोचक टीका; म्हणाले, “निश्चितपणे काहीतरी…”

काँग्रेसचे ‘अंबानी आणि अदानीं’शी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुधवारी प्रथमच केला

Sharad Pawar Gautam Adani Rahul Gandhi
34 Photos
“हिंडेनबर्ग-अदाणी प्रकरणात संसदीय समितीच्या चौकशीची आवश्यकता नाही, कारण…”, शरद पवारांची मोठी विधानं, वाचा…

हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी विधानं केली.…

is it first step towards privatization of power sector maharashtra as adani power application for electricity distribution in navi mumbai
21 Photos
‘अदानी’ला महावितरणची यंत्रणा वापरण्याची परवानगी मिळणार की…; अशी आहे Adani Power ची नवी मुंबईतील विस्ताराची योजना

महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात खासगीकरणाचे पर्व सुरू करण्यासाठीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.

Ambani Adani Nadar
9 Photos
Photos : भारतातील ८ सर्वात श्रीमंत शहरं आणि त्या शहरांमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? फोटो पाहा…

भारत जगाच्या पाठिवर जीपीडीमध्ये पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सध्या एकूण १६६ बिलियनर्स आहेत. त्यापैकी भारताच्या ८ सर्वात श्रीमंत शहरांमधील…

ताज्या बातम्या