कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अॅपल(Apple), अॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.
२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात. Read More
Reliance Intelligence Launched: रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ला प्रोत्साहन आणि चालणा देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची एक नवीन…
US President Donald Trump to Google, Microsoft: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या आयटी कंपन्यांना नोकरभरतीसंदर्भात…