पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.
बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
घरोघरी दूरदर्शनचा पडदा पोहोचल्यानंतर काळाच्या ओघात संगमनेरमधील सर्व चित्रपटगृहे बंद पडली. पडद्यावर एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर संगमनेरकरांना लोणी अथवा…
कुठल्यातरी एका प्रांताची संस्कृती, तिथली सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती, तिथली भाषा या सगळ्याचा अचूक उपयोग करत सगळ्यांनाच आपलासा वाटेल अशा विषयावर…
‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) शुक्रवारी कोलकात्ता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत २४ भारतीय चित्रपटांमधून ‘होमबाऊंड’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार…