भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.Read More
भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे…
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे विभागाद्वारे चक्रधरपूर मंडळात आगामी काळात विविध ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे नवीनीकरण करण्यात येणार असल्याने इतवारी रेल्वे…
भुसावळ-वर्धा मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. हा प्रकल्प भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटी…
दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचंड…