जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे. २०११-१२ मध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियामधील कन्ट्री क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो बीबीएलसारख्या लीग्समध्येही खेळला आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीममध्ये सहभागी करण्यात आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना भारताविरुद्ध खेळला. पुढे दोन वर्षांनी २०१९ मध्ये त्याला एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०१८ मध्ये त्याने सहभाग घेतला होता.
मुंबई इंडियन्सद्वारे त्याच्या आयपीएलच्या प्रवासाची सुरुवात झाली. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे जेसनला आयपीएलमधून बाहेर जावे लागले. ३ एप्रिल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने पदार्पण केले. २०२१ मध्ये जेसन बेहरेनडॉर्फ चेन्नईच्या संघामध्ये गेला. जोश हेजलवुडच्या बदल्यात त्याला खेळवले गेले. पुढे २०२२ च्या लिलावाद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. यंदाच्या हंगामामध्यो तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये परतला आहे.Read More
प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या तीव्र स्पर्धेत आघाडी घेत, अपेक्षित गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पावले उचलणे ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. त्यासाठी…
वर्कइंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘सॅलरी रिपोर्ट २०२५’ अहवालात, २०२३ ते २०२५ दरम्यान झालेल्या पगारातील मोठे बदल, कार्यस्थळातील नवप्रवाह आणि उद्योगवाढीचे चित्र…
देशाच्या अर्थव्यवस्थेची आश्वासक वाढ आणि अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी देशांतर्गत निधीवरील अवलंबित्व यांचा दाखला या जागतिक संस्थेने यासाठी दिला आहे.