scorecardresearch

कोकण रेल्वे

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
Konkan Railway block between asnoti and lolim on July 24 will disrupt train schedules
कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार

कोकण रेल्वेवरील कर्नाटकातील अस्नोटी आणि गोव्यातील लोलिम रेल्वे स्थानकादरम्यान २४ जुलै रोजी सकाळी १०.२० ते दुपारी १.५० दरम्यान ब्लाॅक घेण्यात…

konkan railway roro ferry service loksatta
कोकणवासीयांसाठी शुभवार्ता… ‘रोल-ऑन रोल-ऑफ’मुळे कोकणवासीयांचा गणेशोत्सवातील प्रवास खड्डेमुक्त होणार…

रो-रोची सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होत असून यासाठी २१ जुलै रोजीपासून आरक्षण सुरू झाले आहे.

ganesh festival 2025 konkan railway to run 250 special trains from mumbai
कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त २५० विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईतील कोकणवासियांनी कोकणात गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे.

ganesh festival 2025 konkan railway to run 250 special trains from mumbai
आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेने कोकणात जाणे शक्य… रेल्वेची २५० विशेष रेल्वेगाड्यांची भेट – तिकीटाचे आरक्षण कधी, कसे मिळणार वाचा…

कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय…

ganesh festival 2025 konkan railway to run 250 special trains from mumbai
कोकणातील गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वे कडून कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या आहेत तर मध्य रेल्वेने ११ विशेष गाड्यांची घोषणा केली…

Passengers of Konkan Railway will protest if their demands are not met
कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण करणार

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जल फाउंडेशन कोकण विभाग संघटना…

konkan railway ganesh festival special trains schedule upadate Mumbai
कोकणात जाताय? आरक्षित तिकीटासाठी हे तपासा…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

Waiting list for train in Konkan regret message on website for train reservation Mumbai
कोकणातील रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी हजारापार; अनेक रेल्वेगाड्यांच्या आरक्षणासाठी संकेतस्थळावर ‘रिग्रेट’ संदेश फ्रीमियम स्टोरी

गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील कोकणवासीयांनी कोकणातील गावी जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली असून त्यासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू…

Konkan Railway ticket booking news in marathi
कोकणातील चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून २३ जून पासून गणपती स्पेशल आरक्षण

कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकात बदल करुन आता गणपती स्पेशल आरक्षण कोकणातील चाकरमान्यांसाठी सुरु करत आहे.

Konkan Railway updates monsoon news in marathi
कोकणातील रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावला… कुठे, किती वेगाने धावणार रेल्वेगाडी…

पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून सुरू झाले असून, कोकणातील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांचा प्रवास प्रचंड विलंबाने होण्याची…

संबंधित बातम्या