scorecardresearch

कोयना धरण

महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More
satara district collector visits remote vele village for rehabilitation koyna wildlife sanctuary affected villagers to get land and homes
कोयना अभयारण्यग्रस्त अतिदुर्गम वेळे गावाला सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट

रेनकोट घालून पाऊस झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.

Maharashtra dam silt removal policy Godavari river linking project irrigation boost Telangana desilting model
तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील धरणांमधून गाळ उपसा; पर्यावरणीय परिणामांचा विचार करून नवीन धोरण

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Record inflow of 96 TMC water in Koyna
कोयनेत ९६ टीएमसी पाण्याची विक्रमी आवक; कोयनेतून विसर्ग बंद; पाऊस विसावला

कोयना धरणात पावसाळ्याच्या मध्यापर्यंतच ९६ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ९१.२१ टक्के) अशा विक्रमी पाण्याची आवक होताना, धरणसाठा नियंत्रित राखण्यासाठी…

Heavy rains in the Western Ghats region subside; Koyne gates stand at four feet
पश्चिम घाटक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला; कोयनेचे दरवाजे चार फुटांवर स्थिर

कोयनेच्या जलसाठ्यात २.१६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची आवक होवून जलसाठा ८६.०४ टीएमसी (८१.७५ टक्के) झाला आहे.

Krishna, Warna rivers flood; water in Audumbara Dutt temple
कृष्णा, वारणा नदीला पूर; औदुंबर दत्त मंदिरात पाणी; अलमट्टीतून सव्वालाख क्युसेकचा विसर्ग

गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने कृष्णा, वारणा नदीला पूर आला आहे. कृष्णेतील पाणीपातळी वाढल्याने औदुंबरमधील दत्त मंदिराच्या सभा मंडपात पुराचे…

Heavy rains in Western Ghats trigger dam discharges Krishna river water level rises in Sangli
‘कृष्णा’ वरील पाच बंधारे पाण्याखाली, ‘वारणे’चे पाणी पात्राबाहेर

सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

Koyna dam gates opened further as inflow surges Krishna river level to rise Heavy rainfall karad
पश्चिम घाटात रात्रीत जोरदार तर दिवसभर दमदार पाऊस

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.

संबंधित बातम्या