कुमार कार्तिकेय (Kumar Kartikeya) हा भारतीय गोलंदाज आहे. तो मध्यप्रदेशकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असतो. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. काही महिन्यांनंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळायची संधी मिळाली. कुमारने सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्येही चांगला खेळ केला आहे.
२०१९ ते २०२२ या तीन वर्षांमध्ये कुमार मध्यप्रदेशच्या क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण घटक बनला. २०२२ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. मुंबई इंडियन्सच्या मदतीने त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. अरशद खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मुंबई इंडियन्सला काही सामने खेळवले. या सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत नाव कमावले. आयपीएलच्या या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाकडून खेळणार आहे. Read More
Former French President Nicolas Sarkozy : निकोलस सार्कोझी यांच्यावर २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी प्रचार करण्यासाठी लिबियाहून अवैधपणे निधी मिळवल्याचा व…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर किंवा डेमॉस्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदांची…