scorecardresearch

म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
raigad MHADA Konkan board allotted 66 of 207 houses to landslide victims 44 plots still pending
तळीये दुर्घटना : ४४ घरांसाठी म्हाडाचे कोकण मंडळ जमिनीच्या प्रतीक्षेत

म्हाडा कोकण मंडळाने २०७ घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला असून यातील ६६ घरांचा ताबा कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्तांना देण्यात आला आहे.मात्र त्याचवेळी…

Self-redevelopment is possible even in slum projects! Study group's recommendation
झोपडपट्टी प्रकल्पातही स्वयंपुनर्विकास शक्य! अभ्यास गटाची शिफारस

विकासकांकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्यामुळे झोपडीवासीय विकासकाऐवजी स्वयंपुनर्विकासाला पसंती देत असून त्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे…

MHADA house will be available after 25 years
तब्बल २५ वर्षांनी म्हाडाचे घर मिळणार… पण मोजावे लागणार ५१-५२ लाख रुपये…

म्हाडाच्या कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा येथील भूखंड विक्रीसाठी २००० साली अर्ज मागविले होते.

Two buildings in Worli BDD finally get residential certificates
वरळी बीडीडीतील दोन इमारतींना अखेर निवासी दाखला…आता ५५६ घरांचा ताब्याच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण केले आहे. आता ५५६ घरांचा समावेश असलेल्या या…

Biometric survey now available in cessed buildings too
उपकरप्राप्त इमारतींतही आता बायोमेट्रीक सर्वेक्षण; १३ हजार ९१ इमारतींच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे लक्ष्य

सुमारे १३ हजार ९१ इमारतींमधील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणासाठी खासगी संस्थेची (एजन्सी) नियुक्ती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

government-to-offer-rent-to-tenants-refusing-transit-camps-in-dangerous-buildings
मुंबईतील अतिधोकादायक इमारतींबाबत सरकारचा मोठा निर्णय!

अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास कोणीच तयार नसेल तर म्हाडा संबंधित इमारत ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई…

Motilal Nagar residents protest at Azad Maidan
मोतीलाल नगरवासियांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन; २४०० चौ. फुटाच्या घरांच्या मागणीवर रहिवाशी ठाम

गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोतीलाल नगरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाला सायंकाळी चर्चेसाठी बोलावले. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच म्हाडाबरोबर संयुक्त बैठकीचे आयोजन केली जाईल आणि…

Patrachal residents clash with MHADA
पत्राचाळीतील रहिवाशी धडकले म्हाडावर…६७२ सदनिकांचा ताबा देण्यासह अनेक मागण्या मान्य…

वैयक्तिक करार आणि पुनर्वसित इमारतीतील सर्वच्या सर्व ६७२ घरांचा ताबा सोसायटीला देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी पत्राचाळीतील रहिवाशांनी…

The board has extended the deadline for submitting the Abhyudaya Nagar redevelopment tender
अभ्युदय नगर पुनर्विकास, निविदेला दोन आठवड्यांची मुदतवाढ

अंदाजे ३३ एकर जागेवर वसलेल्या अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीत एकूण ४९ इमारती असून त्यात ३३५० सदनिकांचा समावेश आहे. जुन्या झालेल्या…

MHADA's Chitalsar house is priced at Rs 50 lakhs
म्हाडाच्या चितळसर घराच्या किमती ५० लाखांवर, सोडतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांचा हिरमोड

चितळसरमधील या इमारतींत तब्बल ८५९ सदनिका आहेत. परंतु हे घर आवाक्याबाहेर असल्याचे सोडतीमध्ये इच्छूक असलेल्या अनेकांनी सांगितले.

संबंधित बातम्या