मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ‘एमएमआरडीए’ने सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केले आहे.
एमएमआरडीएच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या ४०,१८७.४१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.