scorecardresearch

नाशिक Videos

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
Police detained Shiv Sena Thackeray faction activists during a protest against Agriculture Minister Manikrao Kokate in Nashik
Manikrao Kokate at Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी…

case raised against farmer in Nashik Sanjay Raut give a letter to devendra fadanvis
Sanjay Raut to Devendra Fadnavis: नाशिकमधील शेतकऱ्याविरोधात खोटा गुन्हा, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री…

sanjay raut gave a reaction on shivsena uddhav balasaheb thackeray group and raj thackeray mns Alliance
Sanjay Raut on MNS: आम्ही सकारात्मक म्हणून कार्यकर्त्यांचं मनोमिलन – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून खासदार…

Sanjay Raut and Eknath Shinde attend wedding ceremony in Nashik
Sanjay Raut And Eknath Shinde: नाशिकमधील लग्न सोहळ्याला संजय राऊत, एकनाथ शिंदेंची उपस्थिती

नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा सोमवारी संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला खासदार संजय राऊत…

sanjay raut made a big statement on nashik kumbhamela and criticized bjp government
Sanjay Raut on Kumbhamela: कुंभमेळ्यातील सगळी कामं गुजरातच्या ठेकेदारांना जाणार – संजय राऊत

नाशिक कुंभमेळ्यातील किमान ५ ते १० हजार कोटी गुजरातच्या ठेकेदारांना जाणार”, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं. नाशिकमध्ये पत्रकार…

Chief Minister Devendra Fadnavis made an important statement about the Brahmin community saying that numbers matter in politics
कुठल्याही क्षेत्रातली १० ठळक नावं काढली तर तीन ते चार नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची- फडणवीस

Devendra Fadnavis ‘संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा, त्यात चित्तपावन समाजाची लोकं दिसतात स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्र बघा…

Congress leader Hussain Dalwai in custody of Nashik police
Husain Dalwai in Nashik: काँग्रेस नेते हुसेन दलवाई नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक शहरातील काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे काँग्रेसचे नेते तथा उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांना शहर…

Women in Nashiks Borichivari village face daily risks as they descend into deep wells to fetch water
Nashik | ५० फूट खोल विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात, नाशिकमध्ये पाणीटंचाईचे भयावह वास्तव

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या बोरीचीवारी गावात पाणीटंचाईचं संकट इतकं तीव्र आहे की महिलांना पाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतो.…

drunk girl gets into an argument with the police watch the viral video who is wrong nashik
Nashik: दारु पिऊन तरुणीचा भररस्त्यात राडा; नाशिकमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Nashik: नाशिकमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीनं रस्त्यावर राडा घातला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.