scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
Jalgaon ncp Protest Against gopichand Padalkar
जळगावात शरद पवार गटाकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला शाई फासून चपलांचा मार !

जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत.

Bhujbal's allegations against Sharad Pawar, Ajit Pawar avoided speaking
भुजबळांचे शरद पवारांवर आरोप, अजित पवारांनी बोलणे टाळले

दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले होते. तेथे पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यावेळी…

rohit pawar slams costly repairs at cm varsha bungalow mumbai
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानातील दुरुस्ती किती खर्च झाला? रोहित पवार यांनी काय आरोप केले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील दुरुस्तीच्या भरमसाठ खर्चावर टीका केली आहे.

Pawar's MLA is behind the attack in Antarwali Sarati, Bhujbal makes serious allegations
अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात, भुजबळांचा गंभीर आरोप

शुक्रवारी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला येथे समता परिषदेचा मेळावा आयोजित…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्या; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे महापालिकेत येत असलेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या वारजे, कात्रज, चांदणी चौक, धायरी या भागातील उड्डाणपूल तसेच नागरिकांना…

Bandu Kaka Bachhav news
दादा भुसे यांना आव्हान देणारे बंडूकाका बच्छाव आता…राष्ट्रवादी शरद पवार गटाचा थेट प्रस्ताव

देवळ्यातील कार्यक्रमास बंडूकाका यांची उपस्थिती आणि खासदार लंके यांच्याकडून त्यांना पक्ष प्रवेशाचे आवाहन, यामुळे बंडूकाकांची पावले शरद पवार गटाच्या दिशेने…

rohit pawar on sanjay shirsat video cidco land scam
५ हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा मंत्री शिरसाटांवर पुन्हा हल्ला; शेअर केलेल्या व्हिडीओत नक्की काय?

Rohit Pawar on Sanjay shirsat राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बिवलकर भूखंड घोटाळाप्रकरणी राज्याचे…

sharad pawar in deola for orphan support
शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्याबरोबर… नाशिक जिल्ह्यातील कोणाची स्तुती ?

अनाथ मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक करत शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

bapu bhegde supporters including congress ncp leaders join bjp in maval
‘मावळ पॅटर्न’ भाजपमध्ये

विधानसभा निवडणुकीत मावळमधून अपक्ष लढलेले बापू भेगडे यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश…

Sharad Pawar along with Supriya Sule and party state president Shashikant Shinde guided the meeting
कृषिविषयक प्रश्नांवरुन नेत्यांची सरकारवर झोड – कर्जमाफीसाठी महिनाभराची मुदत

शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

Tribal instruments including trumpets accompany the protest march in Nashik
गळ्यात कांद्यांच्या माळा, टोपल्यांमध्ये शेतमाल; आक्रोश मोर्चाला तुतारीसह आदिवासी वाद्यांची साथ

शहरातील ईदगाह मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या बैलगाडीवर चढल्या.

संबंधित बातम्या