scorecardresearch

नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 68 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे चरित्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Read More
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा... ‘या’ नेत्याचे सरसंघचालकांना साकडे... (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा… ‘या’ नेत्याचे सरसंघचालकांना साकडे..

२०१४ मध्ये पंतप्रधान पदाची संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची संधी द्यावी, अशी मागणी करणारे खुले पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिले आहे.

‘आरएसएस’च्या स्थापनेमागील खरा उद्देश काय? स्वत: नितीन गडकरींनी केला खुलासा… (लोकसत्ता टिम)
‘आरएसएस’च्या स्थापनेमागील खरा उद्देश काय? स्वत: नितीन गडकरींनी केला खुलासा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतातील एक प्रमुख स्वयंसेवी, सांस्कृतिक व सामाजिक संघटना आहे. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे याची स्थापना केली.

गडकरींच्या टोलपासला फडणवीसाच्या ' समृध्दी' वर बायपास (संग्रहित छायाचित्र)
गडकरींच्या टोलपासला फडणवीसांच्या ‘समृध्दी’ वर बायपास

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ते २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

बालकला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित विदर्भस्‍तरीय खासदार चषक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
गडकरी सहज खरं बोलून गेले, ‘रस्ते अपघात कमी करण्यात अपयश…’

रस्ते अपघात कमी करण्यात आपण अपेक्षित यश मिळवू शकलो नाही, अशी स्पष्ट कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात दिली.

 नितीन गडकरींनी आणले नवीन तंत्रज्ञान  (संग्रहित छायाचित्र)
अमेरिकन सॅटेलाइटचे गडकरींच्या शेतावर लक्ष, काय प्रकार आहे वाचा…

धापेवाडा येथील आपल्या शेतात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक व नैसर्गिक पद्धतीने तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन घेतले.

नागपूरमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांनी  "वंदे मातरम्" सामूहिक गायन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.  (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
नितीन गडकरींच्या उपस्थितीत “वंदे मातरम्” वर्ल्ड रेकॉर्ड, “गिनीज बुक”मध्ये नोंद

वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.

मतदार यादीत दुबार असणारी नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी लक्षपूर्वक कारवाई करावी यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिले (file photo)
गडकरी-फडणवीसांच्या शहरात मतचोरीच्या आरोपांवरून राजकीय वादळ!

लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात मतमोजणी प्रक्रियेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, काँग्रेस आता सत्ताधाऱ्यांविरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

अमरावती मार्गावरील आरटीओ ते नागपूर विद्यापीठ परिसरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे अखेर काम पूर्ण झाले आहे या उड्डाणपुलाचे लोकार्पण ३१ ऑगस्टला होणार आहे. (छायाचित्र -लोकसत्ता टीम )
३१ ऑगस्टपासून नागपुरात आणखी एका उड्डाणपुलाची भर

अमरावती मार्गावरील आरटीओ ते नागपूर विद्यापीठ परिसरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे अखेर काम पूर्ण झाले आहे. या उड्डापुलाचे काम ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या उड्डाणपुलाचे लोकार्पण ३१ ऑगस्टला होणार आहे.

'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५' या वर्षी  नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे.(file photo)
नितीन गडकरी यांना साताऱ्यातील आबासाहेब वीर पुरस्कार

‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५’ या वर्षी भारताचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे.

‘भविष्यात बांबूला उसाचा भाव….,’ नितीन गडकरी यांचे महत्त्वाचे विधान… ( image source - Nitin Gadkari Fb page )
‘भविष्यात बांबूला उसाचा भाव….,’ नितीन गडकरी यांचे महत्त्वाचे विधान…

‘पर्यायी इंधनाला चालना देऊनही देशातील जीवाश्म इंधनाची आयात वाढतच असून, देशाची जीवाश्म इंधन आयात शून्य होईल तो देशासाठी मोठा दिवस असेल,’ – नितीन गडकरी

नितीन गडकरी (file photo)
“दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहीये…” नितीन गडकरी असे कोणाला म्हणाले?

“दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहीये…” ही आपल्या देशाची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या