नितीश चव्हाण (Nitish Chavan) हा मराठी सिनेसृष्टीमध्ये कार्यरत आहे. ७ जुलै १९९० रोजी जन्म झालेल्या नितीशने साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीशने डिझायनिंग आणि डी-डॅक असे कोर्स केले आहेत. महाविद्यालयामध्ये असताना त्याने अभिनय करायला सुरुवात केली. त्याने विठका, तीन पैशाचा खेळ अशा काही मराठी नाटकांमध्येही काम केले आहे. नितीशला अभिनयासह नृत्यकलेचीही आवड आहे. साताऱ्यामध्ये (Satara) त्याने स्वत:ची डान्स अकादमी सुरु केली आहे.
काही जाहिरातींमध्येही तो झळकला आहे. झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ या मालिकेमुळे नितीशला लोकप्रियता मिळाली. त्याने साकारलेली ‘अजय’ ऊर्फ ‘अज्या’ ही भूमिका खूप गाजली. ही भूमिका त्याची ओळख बनली आहे. मागच्या वर्षी त्याने हर हर महादेव या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्याने ‘धनाजी म्हसकर’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. Read More
महानगरपालिका सर्वे क्रमांक २५ मधील संत कबीर नगर वस्ती संदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या याचिकेवर महानगरपालिकेने नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन याेग्य…