scorecardresearch

पोलीस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
baner police arrested thief stole tasha from dhol tasha Pathak practice
ढोल-ताशा पथकातून ताशा चोरणारा अटकेत; चोरट्याकडून १२ ताशे जप्त

पाषाण-सूस रस्त्यावरील एका ढोल ताशा पथकाच्या सरावाच्या जागेतून ताशा चोरणाऱ्या चोरट्याला बाणेर पाोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १२ ताशे जप्त करण्यात…

nagpur Police Commissioner Operation thunder MD drugs sold openly in city
ऑपरेशन थंडर की ब्लंडर ? नागपूरमध्ये एमडी ड्रग्सचा कहर

नागपूरमध्ये पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेचा मोठा गाजावाजा केला.गांजाच्या नावाखाली मेफेडरोन (एमडी)सारख्या अंमली पदार्थांचा खुलेआम…

Aghori act at Banda market in Sawantwadi
सावंतवाडीत बांदा बाजारपेठेत अघोरी कृत्य; परिसरात भीतीचे वातावरण

आज सकाळी गांधी चौकात काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता, त्यांना रस्त्याच्या मधोमध नारळ, हळद, कुंकू आणि टाचण्या टोचलेले…

man killed in ratnagiri
मुलीवर प्रेम करणा-या भाच्याला मामाने संपवीले; मिरकरवाडा येथे एकाचा सुतार आरीने खून; दोघांना अटक

प्रिन्स सहानी ( वय २६) रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

female polices dead body found husband told two acquaintances to murder his wife
महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचे कोडे उलगडले, पतीनेच दिली सुपारी; कारण…

अमरावती येथील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत काल रात्री आढळून आला होता.पती…

navi mumbai police nab suspect in jewelry theft
प्रवासादरम्यान गहाळ झाले १९ लाखांचे दागिने – संशयित ताब्यात; घरात चोरी झाल्याने दागिने जवळच ठेवले होते…

घरात काही दिवसापूर्वी झालेल्या चोरीच्या भीतीने महिला घरातील दागिने सोबत बाळगत होती…

The accused and the police team caught with whale vomit.
रत्नागिरी शहरात अडीच कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१) रा. रत्नागिरी याला कोणतीही परवानगी नसताना, बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने २.५ किलो वजनाचे अंबरग्रीस बाळगताना…

Rs 7 lakh fraud from fake Patanjali website in Navi Mumbai (archived photo)
संकेत स्थळावरून आर्थिक व्यवहार करत आहात? सावधान! नवी मुंबईत पतंजलीच्या बनावट संकेत स्थळावरून ७ लाखांची फसवणूक

आपण उपचार सेवा करू शकत नाहीत हे माहिती असूनही पैसे स्वीकारले आणि परत देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी पाटील यांनी याबाबत…

Police near 2008 malegaon blast site negligent fail to stop blast
मालेगावमधील बॉम्बस्फोटाची घटना टाळता आली असती का ; लोकांचा रोष काय होता ?

मालेगावातील २९ सप्टेंबर २००८ च्या बॉम्बस्फोट घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी बेपर्वाई दाखवली आणि त्यामुळे बॉम्बस्फोटाची घटना रोखणे शक्य…

संबंधित बातम्या