scorecardresearch

राहुल गांधी Videos

RAHUL GANDI

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.


Read More
Chief Minister Devendra Fadnavis response to Rahul Gandhis allegations
Rahul Gandhi & Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठा घोळ झाल्याचा दावा…

राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ
राहुल गांधी विरुद्ध फडणवीस व्हाया निवडणूक आयोग, हा वाद काय? भाजपाच्या उत्तराचे छुपे अर्थ

Rahul Gandhi Vs Devendra Fadnavis Over Election Commission Dispute: राहुल गांधी यांनी शनिवारी इंडियन एक्सप्रेस, लोकसत्तासह काही वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखातून…

Maharashtra CM Devendra Fadnavis Criticised on rahul Gandhis Statement About Ladki bahin yojna
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: राहुल गांधींकडून लाडक्या बहिणींचा अपमान – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लेख लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गेल्या…

Maharashtra CM Devendra Fadnavis Press Conference LIVE
Devendra Fadnavis Live: विधानसभा निवडणूक, राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

Rahul Gandhi made a controversial post about Chhatrapati Shivaji Maharaj on the occasion on ShivJayanti
राहुल गांधींना शिवजयंतीसाठी केलेली पोस्ट भोवणार? पोस्टमधील ‘ती’ वादग्रस्त चूक पाहा

Rahul Gandhi Post for Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्तरांतून छत्रपती शिवाजी…

Rahul Gandhi read Voter data in press conference
Rahul Gandhi: मतदारांची आकडेवारी वाचली अन् ‘हे’प्रश्न उपस्थित केले; राहुल गांधी नेमकं म्हणाले?

Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज राहुल गांधी…

Maharashtra CM Devendra Fadanvis Reactions on Congress Leader Rahul Gandhis Press Conference
Devendra Fadnavis: “जोपर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करत नाहीत तोपर्यंत…”; काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis: आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र…

rahul gandhi made a big statement in sansad
Rahul Gandhi on Maharashtra: महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ? राहुल गांधींनी संसदेत विषय काढला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. महाराष्ट्रात ७० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल…

Dr Manmhan Singh Funeral Rahul Gandhi Sonia Gandhi gave Tribute to Manmohan Singh
Dr Manmhan Singh Funeral: राहुल गांधी, सोनिया गांधींकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप

माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

ताज्या बातम्या