scorecardresearch

रिंकू राजगुरू Videos

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More